राजकीय
सतेज पाटील यांनी अपशकून करून अडथळा आणू नये मंत्री मुश्रीफ
By nisha patil - 8/23/2025 1:19:55 PM
Share This News:
सतेज पाटील यांनी अपशकून करून अडथळा आणू नये : मंत्री मुश्रीफ..
राहुल व राजेश पाटील यांना आशीर्वाद देण्याचा मुश्रीफांचा सल्ला...
कोल्हापूर :दिवंगत काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांनी संपूर्ण हयातभर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी इमानेइतबारे पक्षाची सेवा केली. मात्र आता त्यांच्या मुलांनी भविष्यासाठी अन्य पक्षांत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर प्रतिक्रिया देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले "जर त्यांना सहकार्य करता येणार नसेल, तरी अपशकून करून अडथळा आणू नये. उलट त्यांना आशीर्वाद द्यावेत."मुश्रीफ यांनी थेट आमदार सतेज पाटील यांना उद्देशून हा सल्ला दिला. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, पाटील कुटुंबाचा निर्णय हा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण करणे योग्य ठरणार नाही.
सतेज पाटील यांनी अपशकून करून अडथळा आणू नये : मंत्री मुश्रीफ..
|