बातम्या
स्वप्नपूर्तीबद्दल सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार
By nisha patil - 8/18/2025 11:44:14 AM
Share This News:
स्वप्नपूर्तीबद्दल सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार...
४२ वर्षांच्या लढ्याला यश – सहा जिल्ह्यांच्या नागरिकांना दिलासा
kolhapur -: गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार आणि नागरिकांचा कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लढा सुरू होता. अखेर या चार दशकांच्या लढ्याला यश मिळाले असून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाला.
रविवारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्किट हाऊस येथे सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करून त्यांचे जाहीर आभार मानले. या वेळी आमदार पाटील म्हणाले, “कोल्हापुरचे सर्किट बेंचचे स्वप्न तुमच्यामुळे पूर्णत्वास गेले. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या प्रयत्नांमुळे साकार झाली, याबद्दल आम्ही कोल्हापुरकर सदैव ऋणी आहोत.”
या निर्णयामुळे सहाही जिल्ह्यातील वकील व पक्षकारांचा वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास वाचणार असून कोल्हापुरासाठी हे सुवर्णक्षण असल्याचे पाटील यांनी नमूद केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिकही उपस्थित होते.
स्वप्नपूर्तीबद्दल सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार...
|