बातम्या
सारख्या तंत्रज्ञानासाठी कोल्हापुरात मोहीम राबवा : आमदार सतेज पाटील
By nisha patil - 7/23/2025 3:47:42 PM
Share This News:
सारख्या तंत्रज्ञानासाठी कोल्हापुरात मोहीम राबवा : आमदार सतेज पाटील
इंजिनिअरिंग असोसिएशनच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त उद्योजकांशी संवाद
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सतीश पाटील यांनी उपस्थित राहून सर्व सभासद, पदाधिकारी आणि उद्योजकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, "कोल्हापूरसह राज्याच्या औद्योगिक विकासात इंजिनिअरिंग असोसिएशनचे मोलाचे योगदान आहे. मात्र भविष्यातील स्पर्धा लक्षात घेता, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि तत्सम नवे तंत्रज्ञान कोल्हापुरात आणण्यासाठी असोसिएशनने विशेष मोहीम हाती घ्यावी."
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, ट्रेझरर प्रसन्न तेरदाळकर तसेच संचालक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारख्या तंत्रज्ञानासाठी कोल्हापुरात मोहीम राबवा : आमदार सतेज पाटील
|