बातम्या
सतेज पाटील यांच्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव; ६ लाख वह्यांचे संकलन
By nisha patil - 12/4/2025 11:33:07 PM
Share This News:
सतेज पाटील यांच्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव; ६ लाख वह्यांचे संकलन
कोल्हापूर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी आणि जनतेच्या भरघोस उपस्थितीने उत्साहात साजरा झाला. शुभेच्छा देण्यासाठी ‘यशवंत निवास’ समोर हजारोंच्या गर्दीने रांगा लावल्या.
वाढदिवसानिमित्त ६ लाखाहून अधिक वह्यांचे संकलन झाले. गेल्या १५ वर्षांप्रमाणे, पुष्पगुच्छाऐवजी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम यंदाही यशस्वी झाला.
सतेज पाटील यांनी हनुमान आणि श्री जोतिबा देवाचे दर्शन घेत कार्यक्रमाला सुरुवात केली. कुटुंबीयांच्या उपस्थितीत औक्षण आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
राजकीय, सामाजिक, सहकारी, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्रत्यक्ष व फोनवरून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कर्नाटक व गुजरातमधील अनेक मान्यवरांचा सहभाग नोंदला गेला.
वाढदिवसानिमित्त ‘देवूया गरजूना साथ, वाढदिनी मदतीचा हात’ या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक सेवा राबवण्यात आल्या. अन्नदान, फळवाटप, रक्तदान, कलिंगड वाटप असे लोकोपयोगी उपक्रम कोल्हापूर व इचलकरंजी परिसरात पार पडले.
शिव शाहू मुस्लिम संघटनेच्या वतीने सतेज पाटील यांच्या वजणाइतकी गुळाची तुला करण्यात आली. मातोश्री वृद्धाश्रमातील सदस्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या, ही भेट विशेष भा
वनिक ठरली.
सतेज पाटील यांच्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव; ६ लाख वह्यांचे संकलन
|