बातम्या
आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरंबे येथे विद्यार्थ्यांना संकरित बियाण्यांचे वाटप
By nisha patil - 6/7/2026 11:51:22 PM
Share This News:
आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरंबे येथे विद्यार्थ्यांना संकरित बियाण्यांचे वाटप
कागल : आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पीएम श्री विद्यामंदिर, गोरंबे येथे विद्यार्थ्यांना संकरित बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, काँग्रेस कागल तालुकाध्यक्ष दयानंद पाटील नांदेडकर, युथ काँग्रेस अध्यक्ष अमर चौगुले, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल संकपाळ, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दावणे, सदस्य संदीप पाटील, रमजान मुलाणी, विनायक पाटील, प्रवीण दंडवते तसेच स्वराज्य युवा फाउंडेशनचे पदाधिकारी संदीप चौगुले, शरद वास्कर, अवधूत गायकवाड, राघव आसबे, दत्तात्रय बुजवडे, सागर शेळके, ओंकार शेळके, आशुतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संकरित बियाण्यांचे वाटप करून शेतीविषयक जनजागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आमदार सतेज (बंटी) पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
– तारा न्यूज प्रतिनिधी : अजित बोडके
आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरंबे येथे विद्यार्थ्यांना संकरित बियाण्यांचे वाटप
|