राजकीय
कागल नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सतीश घाडगे यांची निवड
By nisha patil - 3/1/2026 11:48:58 AM
Share This News:
कागल, दि. २: कागल नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या "गटनेतेपदी" विद्यमान नगरसेवक श्री. सतीश घाडगे यांची एकमताने निवड झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन श्री. घाडगे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच; कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी सौरभ पाटील यांची निवड झाल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नूतन नगराध्यक्ष सौ. सविता प्रताप उर्फ भैया माने, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी यांच्यासह, सौ. सुमन चंद्रकांत गवळी, श्रीमती रंजना दिलीप सनगर, सौ. रजिया अस्लम मुजावर, सौ. सुवर्णा कुमार पिष्टे, सौ. पूनम शिवाजी मोरे, सौ. सेहरनिदा नवाज मुश्रीफ, सौ. स्वरूपा सनी जकाते, प्रवीण काळबर, अर्जुन नाईक, अमित पिष्टे आदी नगरसेविका, नगरसेवक व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.
कागल नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सतीश घाडगे यांची निवड
|