बातम्या

सातव्यात “आनंदाचं देणं” उपक्रमाचे दिवाळी फराळ किटचे वाटप!

Satve


By nisha patil - 10/24/2025 3:06:48 PM
Share This News:



सातव्यात “आनंदाचं देणं” उपक्रमाचे दिवाळी फराळ किटचे वाटप!

आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम समाजात ठरला आदर्श!

 दिवाळीच्या आनंदात समाजातील गरजू घटकांनीही सहभागी व्हावे या हेतूने श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट, सातवे यांच्या वतीने आणि शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी (कराड) यांच्या सहकार्याने, तसेच मा. इंद्रजित देशमुख साहेब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली “आनंदाचं देणं” हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सातवे आणि परिसरातील गरजू व ऊसतोड मजूर कुटुंबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. तसेच मा. पंडितराव चौगुले (आपा) यांनी दिलेल्या ₹1000 देणगीतून इंदुश्री बाजार, सातवे यांच्या सहकार्याने ५५ कुटुंबांना आंघोळीच्या साबणाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात डॉ. संतोष निकम, संजय मोरे (मेजर), पोपट सुतार, सतीश डुबल (गुरुजी), शुभम भाकरे आदी ट्रस्ट विश्वस्त व स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या सामाजिक उपक्रमातून दिवाळीचा खरा अर्थ — आनंद वाटण्यात आणि माणुसकी जपण्यात आहे — असा संदेश देत ट्रस्टने समाजासमोर एक सुंदर आदर्श निर्माण केला.


सातव्यात “आनंदाचं देणं” उपक्रमाचे दिवाळी फराळ किटचे वाटप!
Total Views: 45