राजकीय

जनतेच्या विश्वासाच्या लाटेवर सत्यजित जाधव यांचा विजय अटळ – डॉ. दश्मिता जाधव यांचा ठाम विश्वास

Satyajit Jadhavs victory on the wave of public trust is unwavering  Dr Dashmita Jadhavs firm belief


By Administrator - 12/1/2026 7:27:43 PM
Share This News:



कोल्हापूर :- प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराला जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त, विश्वासपूर्ण आणि प्रचंड प्रतिसाद हा त्यांच्या विजयाचा स्पष्ट संकेत देणारा आहे. नागरिक, महिला, तरुण आणि ज्येष्ठ अशा सर्व स्तरांतून मिळणारे प्रेम व पाठबळ पाहता सत्यजित जाधव यांचा विजय निश्चित असून तो जनतेच्या विश्वासाच्या बळावरच घडणार आहे, असा ठाम विश्वास जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी व्यक्त केला.
सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ डॉ. दश्मिता जाधव यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील विविध भागांत पदयात्रा व प्रचारफेऱ्या काढत घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक घरात मिळणारे प्रेम, महिलांचा उत्साह, तरुणांची सकारात्मक भूमिका आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास हा जनतेच्या मनातील भावना स्पष्टपणे दर्शविणारा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रचारादरम्यान त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत विकासाभिमुख नेतृत्वालाच संधी देण्याचे आवाहन केले.
डॉ. दश्मिता जाधव म्हणाल्या, “कोल्हापूरच्या जनतेने आमच्या कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत (आण्णा) जाधव यांची समाजातील प्रत्येक घटकाशी घट्ट नाळ जुळलेली होती. माजी आमदार जयश्री जाधव यांनीही जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. या कुटुंबाची ओळख म्हणजे विकास, विश्वास आणि समाजसेवा.”
शहराच्या विकासाला दिशा देतानाच गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देण्याची परंपरा जाधव कुटुंबाने नेहमीच जपली आहे. क्रीडा क्षेत्रात क्रिकेट, फुटबॉलसह विविध खेळांना प्रोत्साहन देत अनेक होतकरू खेळाडूंना संधी, मार्गदर्शन आणि आधार देण्यात आला आहे. या सामाजिक व क्रीडात्मक कार्यामुळेच जनतेच्या मनात जाधव कुटुंबाबद्दल आजही अपार विश्वास आहे.
हीच समाजसेवेची, विकासाची आणि युवक-युवतींना सक्षम करण्याची परंपरा पुढे नेण्यासाठी जनतेच्या आग्रहास्तव सत्यजित जाधव महापालिका निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विकासकामांची ठोस शिदोरी, स्वच्छ प्रतिमा, तरुणाईचा उत्साह आणि जनतेचे खंबीर पाठबळ यामुळे सत्यजित जाधव यांचा विजय अटळ असल्याचा विश्वास डॉ. दश्मिता जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी लता जाधव, पुनम जाधव, मनीषा पाटील, वैशाली बानदार, पूजा मुळीक, जयश्री कांबळे, नम्रता देवणे, दिलशाद जमादार, अनिता देवणे, पद्मा रसाळ, यास्मिन बामनेकर, शुभ्रा भंडारे, वंदना सरनाईक, सीमा चोपदार, शारदा नलवडे, ज्योती माळी, अरुंधती कांदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
दरम्यान, जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उभे करण्यात आले असून, विविध प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. या महिलांना भविष्यात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे डॉ. दश्मिता जाधव यांनी सांगितले.
“फाउंडेशनच्या असंख्य महिला भगिनी भावाप्रमाणे सत्यजित जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील. महिलांचा विश्वास आणि ताकद हीच आमची खरी शक्ती आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


जनतेच्या विश्वासाच्या लाटेवर सत्यजित जाधव यांचा विजय अटळ – डॉ. दश्मिता जाधव यांचा ठाम विश्वास
Total Views: 22