बातम्या

मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्यमेव जयते किसान गोष्टी कार्यक्रमाचे ऑनलाईन शुभारंभ

Satymev kisan yojna


By nisha patil - 6/29/2026 4:15:40 PM
Share This News:



**मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्यमेव जयते किसान गोष्टी कार्यक्रमाचे ऑनलाईन शुभारंभ*

**आजरा(हसन तकीलदार)*:-महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग "तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा ,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कोल्हापूर आणि पाणी फाउंडेशन व उमेद यांच्या वतीने पंचायत समिती सभागृह आजरा येथे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप डिजिटल शुभारंभ ऑनलाइन किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूषण पाटील (तालुका कृषी अधिकारी,आजरा )उपस्थित होते.

प्रास्ताविकात सहाय्यक कृषी अधिकारी व मेंटर पाणी फाउंडेशन सौ. मनिषा धनाजी पाटील यांनी पाणी फाउंडेशन च्या वतीने घेण्यात येणाऱ्या फार्मर कप स्पर्धेबाबत माहिती दिली. व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून एस.ओ. पी. चा अवलंब करून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक चांगले उत्पन्न व उत्पादन घेवू शकतो आणि आर्थिक बळकटीकरण करू शकतो असे मार्गदर्शन करण्यात आले..

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत शेती केल्यास अधिक उत्पादन व उत्पन्न घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊ असे सांगितले तसेच यातून आर्थिक उन्नती साधता येते असे सांगितले. कृषी विभाग व पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेले फार्मर कप स्पर्धेबाबतचे काम पाणी फाउंडेशन कृषी विभाग व उमेद यांच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून समृद्धीकडे जाण्याचा सगळ्यात मोठा मार्ग हा फार्मर कप च्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान यांनी शेतकरी गटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकत्र करून आपण कृषी क्षेत्रात बदल घडवू शकतो. सत्यमेव जयते फार्मर कपच्या व सर्व मेंटर्स माध्यमातून हे शक्य झाले असल्याचे सांगितलं.

मंडळ कृषी अधिकारी मोहन फुले यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व खरीप हंगाम बाबत मार्गदर्शन केले.

सौ.माया विलास पाटील (निमंत्रक श्री रवळनाथ प्रसन्न शेतकरी गट इटे), सौ.नीता वसंत बोलके (निमंत्रक रणरागिनी शेतकरी गट बोलकेवाडी), सौ.नंदिनी संजय डोंगरे (निमंत्रक भावेश्वरी शेतकरी गट सुलगाव), सौ.तेजस्विनी सम्राटसिंह देसाई (निमंत्रक जगात भारी शेतकरी गट कासारकांडगाव) यांनी गटाच्या माध्यमातून एस.ओ.पी.कॉल च्या सहकार्याने सुरू असलेल्या कामाबाबत अनुभव कथन केले.

अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक )यांनी आभार मानले.

यावेळी दिनेश शेटे (सहाय्यक गटविकास अधिकारी), विजयसिंह दळवी, सतीश कुंभार, प्रकाश पाटील,मिलिंद पाटील (प्रभाग समन्वयक), प्रवीण बोकडे (अभियान व्यवस्थापक), स्वप्नील खोत, श्रीमती शुक्राणी शिंदे, स्वामिनी दातीर, अनिता कांबळे आदी अधिकारी कर्मचारी,आजरा तालुक्यात पाणी फाउंडेशन फार्मर कप मध्ये सहभागी असलेले सर्व शेतकरी गट आणि गटातील निमंत्रक आणि सदस्य उपस्थित होते.


मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्यमेव जयते किसान गोष्टी कार्यक्रमाचे ऑनलाईन शुभारंभ
Total Views: 153