बातम्या
‘खासबाग मैदान वाचवा!’ – मल्लांचा आखाड्यात संताप, महापालिकेला इशारा
By nisha patil - 12/11/2025 4:43:34 PM
Share This News:
‘खासबाग मैदान वाचवा!’ – मल्लांचा आखाड्यात संताप, महापालिकेला इशारा
कोल्हापूर | ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाची दुरवस्था झाल्याने सोमवारी मल्लांनी आखाड्यातच ‘खासबाग मैदान बचाव’ आंदोलन छेडले.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मैदानाची स्थिती अत्यंत वाईट झाल्याचा आरोप करत मल्ल, वस्ताद आणि कुस्तीप्रेमींनी घोषणाबाजी केली. आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ मैदानावर पोहोचले असता उपस्थितांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
मल्लांनी मैदानाची तत्काळ स्वच्छता, सुविधा आणि सरावासाठी खुले करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
‘खासबाग मैदान वाचवा!’ – मल्लांचा आखाड्यात संताप, महापालिकेला इशारा
|