बातम्या

विविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न

Savidhan days


By nisha patil - 11/26/2025 9:55:11 PM
Share This News:



विविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न

आजरा(हसन तकीलदार):-आपले हक्क आणी अधिकार अबाधित ठेवण्यासाठी संविधान दिनाचे महत्व सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवणे आवश्यक असलेचे मत संविधान दिना निमित्ताने व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात शशिकांत सावंत (माजी विस्तार अधिकारी) यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. सुरवातीला फोटो पूजन व उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.

स्वागत व सुत्रसंचालन भिकाजी कांबळे यांनी केले. 

   यावेळी सावंत यांनी बोलताना संविधानांची सर्वाना आवश्यकता असून, अन्याय सहन करण्यासाठी सुध्दा मर्यादा असते, जेष्ठ नागरिक याचे वय साठ कि पासष्ट हा घोळ सुरू आहे. संविधानाचे महत्व व आजच्या दिवसासाठी

 सर्व संघटनाचे पदाधिकारी एकत्र आल्याने समाधान व्यक्त केले. डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी मानव मुक्तीसाठी सर्व जाती धर्माचा विचार करून संविधानाची निर्मिती केली. त्याअगोदर समाज काय अवस्थेत होता हे समजून घेण्यासाठी संविधान व कलमांच्यावर चर्चा आवश्यक असलेचे सांगितले. काशिनाथ मोरे यांनी सजीवसृष्टीला न्याय देण्याचे काम संविधानाने केले असून आरोग्य, शिक्षण सर्वांना मोफत असताना, जाणीव पूर्वक रिक्त जागा ठेवून संविधानाची पायमल्ली होत असल्याचे आरोप केले. यावेळी संदीप दाभिलकर, कॉ. शांताराम पाटील,संतोष मासोळे, सुर्यकांत कांबळे, संजय घाटगे,समिर तकीलदार यानीही आपली मते व्यक्त केली.

यावेळी सुरेश दिवेकर, परसू कांबळे, विजय कांबळे, जालिंदर कांबळे, गिता कांबळे याच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते. आभार विश्वास कांबळे यांनी मानले.

.


विविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न
Total Views: 122