बातम्या

संविधानिक पद्धतीने लढा देऊन काम पूर्ण करण्याची खात्री म्हणजेच बहुजन मुक्ती पार्टी

Savidhata


By nisha patil - 6/28/2026 10:19:32 PM
Share This News:



**संविधानिक पद्धतीने लढा देऊन काम पूर्ण करण्याची खात्री म्हणजेच बहुजन मुक्ती पार्टी*

 पेरणोली ता. आजरा येथे बी. एस. एन. एल. चे बंद टॉवर सुरु*

आजरा(हसन तकीलदार)*:-बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बी. एस. एन. एल.म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड यांना मौजे पेरणोली ता. आजरा येथे बी. एस.एन.एल.चे बंद असलेले टॉवर सुरु करावे असे दोनशेहे लोकांच्या सह्यांचे निवेदन देऊन त्याचा सतत पाठपुरावा तालुका, मंडळ आणि जिल्ह्याच्या बी. एस. एन. एल. अधिकाऱ्याकडे सुरु ठेऊन अखेर पेरणोली येथील बी. एस. एन. एल. चा बंद पडलेला टॉवर सुरु करण्यात बहुजन मुक्ती पार्टीच्या संघर्षाला यश आले आहे.

        मौजे पेरणोली, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथील बी.एस.एन.एल.ला केवळ 2G ची रेंज होती व 4G ची रेंज नसल्यामुळे लोक जिओ, व्हीआय , एअरटेल आदि प्रायव्हेट कंपनीचे सिम कार्ड वापरत होते. परंतु त्यांचेही दर वाढवल्यामुळे लोकांना अनावश्यक पैसे खर्च करावे लागत होते. जे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर झाले आहे.पेरणोली येथे बी.एस.एन.एल.चा एक जुना टॉवर असून त्यावर 2G ची रेंज होती त्यामुळे इंटरनेट चालत नव्हते. याबद्दल पेरणोली मधील कार्यकर्ते अरविंद लोखंडे यांनी आपल्या गावात 4G चालू झाले पाहिजे यासाठी बहुजन मुक्ती पार्टीकडे मागणी केली. त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने पेरणोली, हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव इत्यादी गावांमधील 200 लोकांच्या सह्या घेऊन बी..एस.एन.एल .ला लवकरात लवकर याठिकाणी 4G सेवा सुरू करावी यासाठी निवेदन दिले.निवेदन देण्यासाठी किरण के. के., रवी देसाई, अरविंद लोखंडे, वसंत राजे, डि. के. कांबळे, सुरेश दिवेकर व महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने उपस्थित होते.त्यानंतर त्याचा निरंतर पाठपुरावा करून आता बी. एस. एन. एल. चा 4G टॉवर पेरणोली येथे उभा राहिला आहे..‌

निरंतर पाठपुरावा करून बीएसएनएल चा टॉवर 4G प्रणाली मध्ये मंजूर करून सुरू केल्याबद्दल बहुजन मुक्ती पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

 आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले की,सरकारचे चुकीचे धोरण आणि खाजगीकरणाचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. बी. एस एन. एल. सारख्या सरकारी दुरसंचार कंपनीला डिजिटल आणि विज्ञान युगातही घरघर लागली आहे. 2G आणि 3G च्या पुढे जाण्यास तयार नाही. आजऱ्यासारख्या शहरात सुद्धा दिवस दिवस भर रेंज गायब असते त्यामुळे बी. एस. एन. एल. धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.जिओ, व्ही आय, एअरटेल सारख्या खाजगी कंपन्या बी. एस. एन.एल. च्या जाळ्यावर 5G सारखी सेवा देत आहे. बी. एस. एन. एल. चे जाळे संपूर्ण देशात असताना सुद्धा सेवा देण्यास असमर्थ का आहे? याचे गूढ उकलत नाही. जिओ सारख्या खाजगी कंपन्यांचे मनमानी दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने रेंज आणि नेटची पुरेसी सुविधा देत नसतानादेखील गरीब, सर्वांसामान्य जनता नाईलाजाने बी. एस. एन एल.चा वापर करताना दिसत आहेत. परंतु बी. एस. एन. एल. चांगली सेवा पुरवण्यास कमी पडताना दिसत आहे. 5G ची सुविधा असतानाही केवळ 3G /4G पर्यंतच बी. एस. एन. एल. का अडकली आहे?याचे कोडे उलगडत नाही. आज मोबाईल सेवा ही जीवनाशी निगडित आणि अविभाज्य घटक बनले आहे. आधार लिंक, खत लिंक, गॅस लिंक, शासकीय/निमशासकीय कामकाज, ऑनलाईन देवाण घेवाण, पॅन कार्ड, बँक खाते लिंक इ. साठी मोबाईल सेवा गरजेची बाब बनली आहे. याचाच फायदा घेत खाजगी कंपन्या मनमानी करून जनतेला लुटत आहेत. 4G सेवा असूनही बी. एस. एन. एल. 2G ची सेवा सुद्धा देऊ शकत नाही. यासाठी कमीत कमी दरात बी. एस. एन. एल. ने जनतेला चांगली सेवा पुरवावी, परवडणारे प्लॅन जनतेसाठी द्यावेत यासाठीसुद्धा आपण पूर्ण ताकतीने आंदोलन उभे करणार आहोत असे सांगितले.


संविधानिक पद्धतीने लढा देऊन काम पूर्ण करण्याची खात्री म्हणजेच बहुजन मुक्ती पार्टी
Total Views: 30