बातम्या
२२ वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा! सावली केअर सेंटरला वस्तुरूपी मदतीची गरज
By nisha patil - 10/21/2026 2:58:39 PM
Share This News:
२२ वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा! सावली केअर सेंटरला वस्तुरूपी मदतीची गरज
अंथरुणाला खिळलेल्या आणि गरजू रुग्णांची गेल्या २२ वर्षांपासून सेवा करणाऱ्या पिरवाडी येथील सावली केअर सेंटरने रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दानशूर व्यक्ती, उद्योजक, कंपन्या आणि सामाजिक संस्थांना वस्तुरूपी देणगी देण्याचे आवाहन केले आहे. सावली केअर सेंटरच्या माध्यमातून गरजू रुग्णांची सातत्याने सेवा केली जात आहे. रुग्णांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी संस्थेला विविध वस्तूंची आवश्यकता आहे. यामध्ये ७५ पंखे, ७५ ट्यूबलाईट, ६ टीव्ही, ३ हॉट केस आणि २० व्हीलचेअर यांचा समावेश आहे.
या सर्व वस्तूंचा अंदाजित खर्च ३ लाख ५७ हजार ७५० रुपये इतका आहे. सामाजिक बांधिलकी जपत दानशूर व्यक्तींनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार यापैकी कोणतीही वस्तू देणगी स्वरूपात द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. एक किंवा अधिक वस्तूंचे योगदान देऊनही या सेवाकार्यात सहभागी होता येणार आहे.
रुग्णांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक वस्तू मोलाची ठरणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या सेवाकार्याला हातभार लावावा, असे आवाहन सावली केअर सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
देणगीसाठी संपर्क : ८७९६८७१९९८, ९९७५२१५३१५
पत्ता : सावली केअर सेंटर, पिरवाडी, कोल्हापूर.
२२ वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा! सावली केअर सेंटरला वस्तुरूपी मदतीची गरज
|