बातम्या

बॉम्बेऐवजी ‘मुंबई’ म्हणा; अमेय खोपकरांचा कपिल शर्माला इशारा

Say Mumbai instead of Bombay


By nisha patil - 11/9/2025 4:51:15 PM
Share This News:



बॉम्बेऐवजी ‘मुंबई’ म्हणा; अमेय खोपकरांचा कपिल शर्माला इशारा
 

कपिलच्या शोतील क्लिपवरून मनसे चित्रपट सेनेचा आक्षेप

मुंबई : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रडारवर आला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या शोबाबत थेट विनंतीवजा इशारा दिला आहे. मुद्दा आहे मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणण्याचा.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असून, या शोमध्ये अनेकदा ‘बॉम्बे’ असा उल्लेख होत असल्याचे खोपकर यांनी निदर्शनास आणले आहे. त्यांनी शोमधील एक क्लिप एक्स (ट्विटर)वर शेअर करत लिहिलं – “बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन तीस वर्षे उलटली, तरी कपिल शर्मा शोमध्ये सेलिब्रिटी गेस्ट, शो अँकर, दिल्लीस्थित खासदार आणि बॉलिवूड कलाकार अजूनही सर्रास ‘बॉम्बे’ असा उल्लेख करतात. 1995 साली राज्य शासनाने आणि 1996 मध्ये केंद्र शासनाने अधिकृत मान्यता देऊन ‘मुंबई’ नाव ठरवले. त्यामुळे या नावाचा मान राखावा.”

खोपकरांनी पुढे स्पष्ट केलं की, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकात्याचे नामांतर झाल्यानंतरसुद्धा मुंबई आधी अधिकृतरीत्या मान्य झाली आहे. त्यामुळे आता ‘मुंबई’चाच उल्लेख करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

या संदर्भात कपिल शर्मा किंवा त्यांच्या टीमकडून उत्तर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


बॉम्बेऐवजी ‘मुंबई’ म्हणा; अमेय खोपकरांचा कपिल शर्माला इशारा
Total Views: 94