बातम्या
बाळूमामा देवस्थानच्या जमीन व्यवहारात ११.५६ कोटींचा घोटाळा!
By nisha patil - 11/23/2026 3:38:34 PM
Share This News:
बाळूमामा देवस्थानच्या जमीन व्यवहारात ११.५६ कोटींचा घोटाळा!
आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानच्या जमीन खरेदी व्यवहारात ११ कोटी ५६ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे. शेतकऱ्यांकडून दोन लाखांना खरेदी केलेली जमीन अवघ्या आठ दिवसांत देवस्थानला अडीच कोटींना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मार्च २०२० ते मार्च २०२६ या काळात मेंढ्यांची विक्री आणि जमीन खरेदी व्यवहारांत ६० कोटी ७५ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तत्कालीन प्रशासक रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह एजंटांवर गुन्हा दाखल असून पाच एजंटांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या एजंटांच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सहधर्मादाय आयुक्तांनाही अंधारात ठेवून हे व्यवहार झाल्याचा संशय असून विशेष तपास पथकाकडून आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे.
बाळूमामा देवस्थानच्या जमीन व्यवहारात ११.५६ कोटींचा घोटाळा!
|