बातम्या
पेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सवानिमित्य समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कुलबँग वाटप
By nisha patil - 6/20/2026 10:28:16 PM
Share This News:
**पेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सवानिमित्य समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कुलबँग वाटप*
**आजरा(हसन तकीलदार)*पेरणोली ता. आजरा येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगेचे वाटप करण्यात आले.
यावेळी समितीचे सदस्य तानाजी देसाई यांनी मराठी शाळेचा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य सर्वांना लाभले असून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी स्कूल बँगेचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते बँगेचे वाटप करण्यात आले.
यावेळी समिती सदस्य कॉ.संपत देसाई, राजेंद्र सावंत, उपसरपंच संकेत सावंत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश जोशीलकर,कृष्णा सावंत(पत्रकार ), सुरेश कालेकर,मारूती वरेकर,अमित सावंत,काका देसाई, नामदेव मोहीते,पवन कालेकर, संदीप पारदे, सुरेखा नाईक,शिवाजी बोलके आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. तानाजी पावले यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी रावण यांनी आभार मानले.
पेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सवानिमित्य समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कुलबँग वाटप
|