बातम्या
आदर्श विद्या मंदिर यादववाडी व्हन्नूर येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन; अध्यक्षपदी अनिल संकपाळ, उपाध्यक्षपदी दिपाली कांबळे
By nisha patil - 9/22/2026 1:55:43 PM
Share This News:
आदर्श विद्या मंदिर यादववाडी व्हन्नूर येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन; अध्यक्षपदी अनिल संकपाळ, उपाध्यक्षपदी दिपाली कांबळे
कागल प्रतिनिधी - अजित बोडके व्हन्नूर, ता. कागल - आदर्श विद्या मंदिर यादववाडी व्हन्नूर शाळेची शाळा व्यवस्थापन समिती सोमवार दिनांक 21/09/2026 रोजी स्थापन करण्यात आली.
या समितीमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून अनिल संकपाळ, सर्जेराव खापणे, मनोज संकपाळ, रेश्मा प्रवीण खापणे, पूजा संदीप वाडकर, मेघा आशिष खाडे, पूजा लोहार, सुनील कांबळे, दिपाली कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून साताप्पा खाडे, शिक्षक प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब सासमिले सर आणि सचिव म्हणून रघुनाथ जाधव सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित समितीच्या अध्यक्षपदी अनिल संकपाळ तर उपाध्यक्षपदी दिपाली कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आदर्श विद्या मंदिर यादववाडी व्हन्नूर येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन; अध्यक्षपदी अनिल संकपाळ, उपाध्यक्षपदी दिपाली कांबळे
|