ताज्या बातम्या
एच.पी.व्ही. लसीकरणासाठी शालेय मुलींना सक्ती नको -बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
By nisha patil - 5/11/2025 12:32:47 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एच.पी.व्ही.या विषाणूमुळे मुलीमध्ये व महिलामध्ये गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एच.पी. व्ही. व्हॅक्सीन मुलींना शालेय जीवनात देण्याचा उपक्रम सरकारच्या माध्यमातून काही शाळांमध्ये सुरु केलेला आहे.
ही लस देण्याची सुरवात दि. 16 डिसेंबर 2024 पासून पुणे येथील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही महाविद्यालयात देण्यात आली आहे. ही लस ऐच्छिक असतानासुद्धा सक्ती केली जात आहे. या लसीचे दुष्परिणामही दिसून येत असल्याने शाळेतील विद्यार्थिनींवर या लसीकरणासाठी सक्ती करण्यात येऊ नये असे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने आजरा तहसीलदार यांना दिले आणि हे निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले.
एच. पी.व्ही. नावाची लस ही सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया प्रा.लि. या संस्थेद्वारे दिली जात आहे. 2019-20ला जी कोविड -19 ही लस दिली गेली होती ती सुद्धा याच संस्थेमार्फत दिलेली होती. दि. 25 सप्टेंबर 2024 ला अवेकन इंडिया मूव्हमेंट या सामाजिक संघटनेमार्फत 50 वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या संमतीने आणि सहीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांना एच.पी. व्ही. लसीकरणाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त करून लसीकरण तात्काळ थांबवण्याची मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित करणारी एक कायदेशीर नोटीस आय. ए. एस. मुख्य सचिव, महाराष्ट्र यांनाही पाठवली आहे. लसीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी पालकांकडून माहितीपूर्ण संमती घेणे आणि लसीमधील घटक आणि प्रतिकूल घटनाबद्दल मोठया प्रमाणात जागृत करणे बंधनकारक आहे. कोणीही पालकांना त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यास नकार देण्याचे कारण विचारू शकत नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे आणि ते अनिवार्य केले आहे
दि. 18 मार्च 2025 ला ही लस कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मलगे बुद्रुक गावातील प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या मुलींना वर्षातून दोनवेळा ही लस दिली गेली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही शाळामध्ये तर अशा प्रकारचे संमती पत्र पालकांकडून लिहून घेतलेले आहे व ते देण्यासाठी पालकांना शिक्षकांमार्फत जबरदस्ती केली जात आहे. ही लस दिल्यामुळे परिणाम असा झाला आहे की, त्या मुलींना मासिक पाळी सुरु झाली चक्कर येणे, श्वास घेताना त्रास होणे असे गंभीर परिणाम मुलींमध्ये दिसून आले. ही लस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर बिहार, कर्नाटक यासारख्या राज्यात देखील दिली जात आहे. मुलीमध्ये तिव्र डोकेदुखी, ताप, उलटी, सांधेदुखी, अचानक चक्कर येणे यासारखे परिणाम दिसून आलेले आहेत. केवळ एच.पी. व्ही. विष्णुमुळेच हा गर्भाशयाचा कर्क रोग होतो असे नाही तर वेगवेगळ्या कारणांनीसुद्धा हा रोग होऊ शकतो. एकंदरीत एच.पी.व्ही.लसीकरणाच्या बाबतीत कोणतीही सुरक्षा नसताना सरकार मुलींच्या आरोग्याशी खेळण्याचे काम करीत आहे. हे थांबवण्यासाठी तसेच विद्यार्थीनी व पालकांवरती लसीकरण करण्यासाठी जी जबरदस्ती केली जात आहे ती थांबवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने हे निवेदन आजरा तहसीलदार यांना दिले आहे. निवेदनावर डॉ. सुदाम हरेर(तालुकाध्यक्ष), झुल्पीकार शेख, गणपती कांबळे, अमित सुळेकर, मारुती गुरव, तुकाराम कांबळे, सूर्यकांत कांबळे, बाबासो घोरपडे, वदूत तकीलदार आदींच्या सह्या आहेत.
एच.पी.व्ही. लसीकरणासाठी शालेय मुलींना सक्ती नको -बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
|