विशेष बातम्या
सरकारी शाळा बंद करण्याविरोधात आजऱ्यात शाळा बचाव आंदोलन
By nisha patil - 12/15/2025 4:01:34 PM
Share This News:
सरकारी शाळा बंद करण्याविरोधात आजऱ्यात शाळा बचाव आंदोलन
शिक्षण धोरण चुकीचे; नागपूरमधील शिक्षक आंदोलनाला आजऱ्यातून पाठिंबा
शिक्षणाबाबत सरकारचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप करत सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आजरा तालुक्यात आंदोलन करण्यात आले.
आरदाळ, ता. आजरा येथील कॉ. शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसील कार्यालयासमोर शाळा बचाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सरकारी शाळा हळूहळू बंद केल्या जात असून त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे शिक्षणाचा मूलभूत हक्क धोक्यात आला असून, हे धोरण तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनातून नागपूर येथे सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सरकारी शाळा बंद करण्याविरोधात आजऱ्यात शाळा बचाव आंदोलन
|