ताज्या बातम्या
Scientific conference on infertility ...वंध्यत्वावर आधारित शास्त्रीय परिषद कोल्हापुरात यशस्वीपणे संपन्न
By nisha patil - 12/7/2025 7:21:31 PM
Share This News:
वंध्यत्वावर आधारित शास्त्रीय परिषद कोल्हापुरात यशस्वीपणे संपन्न
ISAR महाराष्ट्र व KOGS यांच्या संयुक्त आयोजनात दोन दिवस चर्चा व सादरीकरण
कोल्हापूर : वंध्यत्वासारख्या वाढत्या आरोग्य समस्येवर दोन दिवसीय शास्त्रीय परिषद १२ व १३ जुलै रोजी कोल्हापुरात पार पडली. ISAR महाराष्ट्र शाखा आणि KOGSच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत IVF, IUI, हार्मोनल असंतुलन, टेस्ट ट्यूब बेबी, जनुकीय चाचण्या अशा विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
.jpg)
डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. किरण कुर्तकोटी प्रमुख पाहुणे होते.
राज्य व देशभरातील नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, embryologist व संशोधकांचा सहभाग होता. नवोदित डॉक्टरांनी शोधनिबंध सादर केले.ही परिषद कोल्हापूरमधील वैद्यकीय क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचं व्यासपीठ ठरली, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
.jpg)
Scientific conference on infertility ...वंध्यत्वावर आधारित शास्त्रीय परिषद कोल्हापुरात यशस्वीपणे संपन्न
|