बातम्या
लोखंडी भंगार चोरी प्रकरण : आरोग्य निरीक्षक कवडे सेवा समाप्त, मुकादम लोंढे निलंबित
By nisha patil - 6/5/2025 9:11:22 PM
Share This News:
लोखंडी भंगार चोरी प्रकरण : आरोग्य निरीक्षक कवडे सेवा समाप्त, मुकादम लोंढे निलंबित
कोल्हापूर, दि. ६ : कसबा बावडा लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे यांना महापालिकेच्या सेवेतून कमी करण्यात आले असून, झाडू कामगार तथा मुकादम दादासो जयवंत लोंढे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केली.
प्रकल्पावरील भंगार चोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर २० मार्च रोजी सहायक आयुक्त कृष्णा पाटी व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी पाहणी केली. चौकशीदरम्यान पोकलेन ऑपरेटर, स्क्रॅप खरेदी-विक्री करणारी व्यक्ती व ट्रॅक्टर ट्रॉलीचालक यांनी कवडे यांच्या सांगण्यावरून दोनवेळा भंगार विक्री केल्याचा कबुलीजबाब दिला. त्यामुळे कवडे यांना सेवा समाप्त करण्यात आली.
दरम्यान, मुकादम लोंढे यांच्याविरोधातही गंभीर आरोप सिद्ध झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांनी भंगार विक्रीत सहभाग घेतल्याचे व रक्कम स्वीकारल्याचे जबाबात नमूद केले आहे.
लोखंडी भंगार चोरी प्रकरण : आरोग्य निरीक्षक कवडे सेवा समाप्त, मुकादम लोंढे निलंबित
|