राजकीय

जिल्हा परिषद, पंचायत समिती दाखल उमेदवार अर्ज छाननी पूर्ण

Scrutiny of candidate applications filed by Zilla Parishad Panchayat Samiti complete


By nisha patil - 1/23/2026 11:29:13 AM
Share This News:



जिल्हा परिषद, पंचायत समिती दाखल उमेदवार अर्ज छाननी पूर्ण


आजरा (हसन तकीलदार ) :- आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी तहसीलदार कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पार पडली. छाननीनंतर पात्र ठरलेल्या अर्जाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार (दि. 27) रोजी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात सर्वच पक्षांनी सवतासुभा मांडला आहे.आतापर्यंत आघाड्या करुन निवडणूका लढविल्या जात असे.यावेळी सर्वांनीच एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्याने आता  तालुक्यात कुणाची किती ताकद आहे हे कळणार.
   आजरा तालुक्याची परिस्थिती पहाता  राष्ट्रीय काँग्रेस व्यतिरिक्त सर्वच पक्ष आपापल्या क्षमतेनुसार रिंगणात आहेत.एकेकाळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्यात पक्षाचा उमेदवार नाही ही खेदजनक बाब आहे.नगरपंचायतीच्या निवडणूकीत सक्षम असणारी काॅंग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उदासीन का राहिली आहे हे ही एक गूढ बनले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट न केल्याने हे अधिकच गूढ झाले आहे. छाननी नंतर पात्र उमेदवार असे---  *पंचायत समिती - उत्तूर मतदारसंघ (पात्र उमेदवार)
 अभिजीत अमृत आरेकर (उत्तुर) - काँग्रेस, संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर) - शिवसेना (शिंदे गट), विकास वसंत चोथे (बहिरेवाडी) - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट),
 सागर शशिकांत वाघरे (होन्याळी) - शिवसेना (ठाकरे
गट), महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर) - ताराराणी आघाडी,चंद्रकांत ईश्वर गोरुले (बहिरेवाडी) - अपक्ष, व्यंकटेश बंडेराव मुळीक (उत्तूर) - अपक्ष,
*पंचायत समिती - भादवण मतदारसंघ*
जयश्री गजानन गाडे (भादवण) - राष्ट्रवादी काँग्रेस (आजेत पवार गट), भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे) - शिवसेना (शिंदे गट), साधना संजय केसरकर (भादवण) - ताराराणी आघाडी,विजया जनार्दन निऊंगरे (मडीलगे) - अपक्ष, श्रीदेवी महादेव पाटील (गजरगाव) - अपक्ष,वर्षा विकास बागडी (कोवाडे) - अपक्ष, *पंचायत समिती - पेरणोली मतदारसंघ*
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली) - भाजप,श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव) - शिवसेना (शिंदे गट), अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे) - वंचित बहुजन आघाडी,जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव) - अपक्ष, मनीषा गोविंद गुरव (हरपवडे) - अपक्ष, रेखा रणजीत पाटील (गवसे) - अपक्ष,रूपाली धनंजय पाटील (साळगाव) - अपक्ष, वंदना राजाराम पाटील (देवर्डे) - अपक्ष, सुमन राजाराम पोतनीस (सातेवाडी) - अपक्ष,यशोदा युवराज पोवार (देऊरळवाडी) - अपक्ष, रचना राजाराम होलम (पोळगाव) - अपक्ष,
*पंचायत समिती - वाटंगी मतदारसंघ*
समीर दशरथ पारदे (मलिग्रे) - भाजप, कृष्णा विष्णू पाटील (होनेवाडी) - शिवसेना (ठाकरे गट), सतीश गणपती फडके (सुळे) - शिवसेना (शिंदे गट),राजाराम गुणाजी होलम (पोळगाव) - राष्ट्रवादी कॉँग्रेस (आजित पवार गट), किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे) - अपक्ष,शंकर गोविंद कुराडे (लाकूडवाडी) - अपक्ष,संजय अर्जुन तरडेकर (जेऊर) - अपक्ष, बळवंत जानू शिंत्रे(आजरा) - अपक्ष, अशोक मारुती शिंदे (मलिग्रे) - अपक्ष, नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी) - अपक्ष, सजय बाळू सांबरेकर (चितळे) - अपक्ष,
*जिल्हा परिषद - उत्तूर मतदारसंघ* 
विठ्ठल महादेव उत्तूरकर - शिवसेना (शिंदे गट),शिरीष हिंदुराव देसाई - राष्ट्रवादी काग्रेस (अजित पवार
 गट),उमेश मुकुंदराव आपटे - ताराराणी आघाडी, वैशाली उमेश आपटे - अपक्ष,परशुराम ईश्वर कांबळे - अपक्ष,धनश्री मानसिंग देसाई - अपक्ष,अश्विन अर्जुन भुजंग - अपक्ष 
*जिल्हा परिषद - पेरणोली मतदारसंघ
 जयवंत मसणू सुतार - भाजप, विष्णू मोतबा केसरकर - शिवसेना (शिंदे गट),सुधीर राजाराम देसाई - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), सुधीर रामदास सुपल - राष्ट्रीय समाज पक्ष संदीप,मारुती चौगले - अपक्ष,रामचंद्र भिकू पाटील - अपक्ष, राजाराम पांडुरंग पोतनीस - अपक्ष, सुरेश कृष्णा शिंगटे - अपक्ष, रणोजेतकुमार सूर्यकुमार सरदेसाईं - अपक्ष.
माघारीनंतर कोणत्या मतदारसंघात थेट लढत होणार तर कुठे अपक्षांची संख्या निर्णायक ठरणार, हे स्पष्ट होणार असून आजरा तालुक्यातील निवडणूक रंगात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेमकी लढत कोणाकोणात होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


जिल्हा परिषद, पंचायत समिती दाखल उमेदवार अर्ज छाननी पूर्ण
Total Views: 219