बातम्या
गाडीच्या सीटखाली दारूचे गुप्त कप्पे! कागलमध्ये ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
By nisha patil - 11/27/2026 8:40:58 PM
Share This News:
गाडीच्या सीटखाली दारूचे गुप्त कप्पे! कागलमध्ये ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यासाठी चक्क चारचाकी गाडीत तयार केले गुप्त कप्पे. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हा डाव उधळून लावत तब्बल ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कागलमधील लक्ष्मीटेक परिसरात ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात वाहतूक आणि विक्रीस बंदी असलेली गोवा बनावटीची दारू घेऊन एक व्यक्ती चारचाकी गाडीतून येणार असल्याची माहिती LCB ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री सापळा रचून राहुल जोतीराम पाटील या ५५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याच्या चारचाकी गाडीची तपासणी केली असता सीटखाली दोन गुप्त कप्पे तयार केल्याचे आढळले. यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या. या कारवाईत सुमारे ८० हजार रुपयांची दारू, रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी गाडी असा एकूण ५ लाख १५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
गाडीच्या सीटखाली दारूचे गुप्त कप्पे! कागलमध्ये ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
|