बातम्या
नगरपरिषद व पंचायत मतदार संघाच्या हद्दीत कलम 163 लागू
By nisha patil - 1/12/2025 5:03:36 PM
Share This News:
नगरपरिषद व पंचायत मतदार संघाच्या हद्दीत कलम 163 लागू
कोल्हापूर, दि. 1: निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व आदर्श आचार संहितेचे पालन व कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीच्या मतदार संघाच्या हद्दीत 3 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्राच्या परिसरामध्ये खालील कृती करण्यास मनाई केली आहे.
निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी 6 वाजण्यापूर्वी व रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय व्यासपिठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तरी 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद करण्यात यावा. तदनंतर सभा/मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणुक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी/ प्रसारण देखील बंद करावे. कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचारच्या अनुषंगाने मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणाच्या जवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था, इ. सारख्या सार्वजनिक ठिकाणाच्या जवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 च्या अनुषंगाने मतदानादिवशी मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासुन 200 मीटरच्या परीसरात कोणाही व्यक्तिला खालील कृत्ये करता येणार नाहीत-
कोणत्याही स्वरुपात निवडणूक विषयक प्रचार करणे. मतदारांना धमकविणे, मतदारावर ठराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे. मतदाराचा मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे. उमेदवाराचे चिन्ह दर्शविणारे नोटीस बोर्ड प्रदर्शित करणे. मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करणे तसेच मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करणे. (निवडणुकीचे कामकाजात नेमलेले शासकीय अधिकारी/कर्मचारी वगळून) राज्याची अगर देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अगर आदर्श आचारसंहिता भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करता येत नाही. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 च्या अनुषंगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127 (अ) मधील तरतुदीचा भंग होईल अशाप्रकारे कोणत्याही निवडणूक प्रचाराविषयक साहित्याची छपाई करता येणार नाही.
शस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र नियम 1962 च्या तरतुदीखाली विशिष्ट परिस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षकांच्या पूर्वपरवानगीने (खासगी सुरक्षा वगळून) नॅशनलाईज्ड बँका, सहकारी तत्वावरील बँका, महत्वाची धार्मिक स्थळे, रायफल क्लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगिक युनिट, पब्लिक एंटरप्राईजेस यांना अशी हत्यारे (व दारुगोळा) वाहतुक करता येईल. तथापि हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना (पोलीस अधिकारी व अंमलदार) यांना लागू राहणार नाही.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 च्या कालावधीत मोटारगाड्या, वाहने हो कोणत्याही परिस्थितीत 03 (तीन) पेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात चालविण्यात येवू नयेत. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
नगरपरिषद व पंचायत मतदार संघाच्या हद्दीत कलम 163 लागू
|