शैक्षणिक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात व्यंकटराव हायस्कूलचे घवघवीत यश

Selection for district level


By nisha patil - 12/13/2025 12:57:13 PM
Share This News:



 आजरा (हसन तकीलदार) : आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे झालेल्या ५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उपकरण निर्मिती व प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

माध्यमिक गटात कु. आस्था सचिन गुरव व हाफिजमहंमद इरफान सय्यद यांनी पिझो इलेक्ट्रिसिटीवर आधारित उपकरण तयार करून प्रथम क्रमांक पटकावला. लहान गटात हर्षद केसरकर व राम शिप्पूरकर यांच्या स्मार्ट हेल्मेट उपकरणास उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. प्रश्नमंजुषेत वेदांग शिंदे, मिताली धुरे व आर्णवी कामत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

शिक्षक उपकरण निर्मिती स्पर्धेत सौ. आशा सचिन गुरव यांच्या “चला शिकूया मनोरंजक विज्ञान” या संकल्पनेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात व्यंकटराव हायस्कूलचे घवघवीत यश
Total Views: 202