बातम्या
खो–खो स्पर्धेत उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजराच्या मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड**
By nisha patil - 9/19/2025 12:24:46 PM
Share This News:
खो–खो स्पर्धेत उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजराच्या मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड**
*आजरा (हसन तकीलदार)*:-जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय खो–खो स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून विविध शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व खो–खो या खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय खो–खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष हाजी आलम अहमद नाईकवाडे, सर्व संचालक मंडळ, प्र. मुख्याधपक सलीम शेख, सर्व वर्ग शिक्षक तसेच क्रीडाशिक्षक शेरखान पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खो–खो स्पर्धेत उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजराच्या मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड**
|