बातम्या

साताऱ्यात स्वाभिमानीचा एल्गार! पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

Selfrespecting people in Satara


By nisha patil - 11/16/2026 2:51:38 PM
Share This News:



साताऱ्यात स्वाभिमानीचा एल्गार! पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली आहे. जरंडेश्वर, जयवंत शुगर्स, अजिंक्यतारा, सह्याद्री आणि कृष्णा या कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवली आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला, तरी शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाचेही ऊस बिल मिळाले नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी अदा करणे बंधनकारक असताना कारखानदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखानदारांनी संगनमत करून शेतकऱ्यांची लूट सुरू केल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. सर्रास काटामारी आणि रिकव्हरी चोरी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत ऊसाने भरलेली वाहने सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराचा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


साताऱ्यात स्वाभिमानीचा एल्गार! पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली
Total Views: 15