बातम्या

आजी-आजोबांच्या सन्मानाने कुमार विद्यामंदिरात रंगला ज्येष्ठ नागरिक दिन

Senior Citizens Day celebrated at Kumar Vidyamandir in honor of grandparents


By Shivani - 1/10/2026 11:26:13 PM
Share This News:



आजी-आजोबांच्या सन्मानाने कुमार विद्यामंदिरात रंगला ज्येष्ठ नागरिक दिन
 

पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावरमहाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार कुमार विद्यामंदिर, पन्हाळा येथे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या घरातील आजी-आजोबा व ज्येष्ठ नागरिकांना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
         

 यावेळी शाळेचे अष्टपैलू शिक्षक सरदार गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनसंघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “पूर्वीच्या काळात पाच रुपयांत संपूर्ण आठवड्याचा बाजार केला जात असे. पायी प्रवास करून, वीज व आधुनिक वाहनांची सुविधा नसतानाही या पिढीने कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
         

ज्येष्ठ नागरिकांप्रती मुलांच्या मनात आपुलकी व आदराची भावना निर्माण व्हावी, तसेच वाढत्या वृद्धाश्रमांच्या प्रवृत्तीपासून दूर राहून कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान व सहवास जपला जावा, या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबविल्याचे यावेळी सांगण्यात आले.
           

कार्यक्रमास पन्हाळा नगरसेविका श्रीमती रशिदा मन्सूर मुजावर, माधुरी सदाशिव ,आयरेकर, सुनीता ज्योतीराम काशीद, सुनीता उदाळे, ज्येष्ठ नागरिक रशीद नायकवडी, सुनील उदाळे, मुख्याध्यापिका रमणा चिली, तसेच कुमार विद्यामंदिर शालेय समितीचे अध्यक्ष शहाबाज मुजावर उपस्थित होते.


आजी-आजोबांच्या सन्मानाने कुमार विद्यामंदिरात रंगला ज्येष्ठ नागरिक दिन
Total Views: 32