ताज्या बातम्या

ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन; सार्वजनिक जीवनातील अभ्यासू नेतृत्व हरपले

Senior Congress leader Suresh Kalmadi passes away A scholarly leader in public life has been lost


By nisha patil - 6/1/2026 3:59:50 PM
Share This News:



ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक अनुभवी, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व हरपले आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक व राजकीय वाटचालीत त्यांनी बजावलेली दीर्घकाळची भूमिका सदैव स्मरणात राहील.

काँग्रेस विधानमंडळ पक्षाचे नेते तथा आमदार मा. सतेज पाटील यांनीही कलमाडी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.


ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन; सार्वजनिक जीवनातील अभ्यासू नेतृत्व हरपले
Total Views: 31