विशेष बातम्या
हुपरीत वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By nisha patil - 11/8/2025 4:15:07 PM
Share This News:
हुपरीत वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
हुपरी (ता. हातकणंगले) येथे वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या वेळी कोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाज अध्यक्ष गुरु बाळ माळी, जिल्हा अध्यक्षा श्रीमती वंदना माळी, प्रा. देवानंद जंबगी, डॉ. दिगंबर माळी, कुमार उर्फ भीमराव माळी, अरविंद पारगावे, अमोल माळी, अभिनव गोंधळी, सुहास जाधव, प्रकाश मुधाळे, तेजस कांबळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुपरीत वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
|