बातम्या
कागल चेकपोस्ट नाक्यावरील चुकीच्या रम्बलरमुळे अपघातांचे सत्र सुरूच; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
By nisha patil - 2/10/2026 3:53:48 PM
Share This News:
कागल चेकपोस्ट नाक्यावरील चुकीच्या रम्बलरमुळे अपघातांचे सत्र सुरूच; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
कागल प्रतिनिधी अजित बोडके : कागल चेकपोस्ट नाक्याच्या हायवेवर अदानी समूह व हायवे अथॉरिटीने मारलेले चुकीचे व नियमबाह्य रम्बलर वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहेत. या चुकीच्या पद्धतीच्या रम्बलरमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचा आरोप होत आहे.
रम्बलरवरून गाडी जाताना गाडी रस्ता सोडते, त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी साईटला जाऊन आदळते व भीषण अपघात होतो. विशेषतः रात्रीच्या वेळेस मोठ्या वाहनांना हे रम्बलर लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करून नियमाप्रमाणे रम्बलर बसवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र व उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोडेकर यांनी दिला आहे.
कागल चेकपोस्ट नाक्यावरील चुकीच्या रम्बलरमुळे अपघातांचे सत्र सुरूच; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
|