बातम्या

जोतिबा डोंगरावर भेसळयुक्त पेढा विक्रीचा गंभीर आरोप

Serious allegations


By nisha patil - 8/13/2025 4:41:15 PM
Share This News:



जोतिबा डोंगरावर भेसळयुक्त पेढा विक्रीचा गंभीर आरोप

दोन ते अडीच कोटी भाविकांच्या आरोग्यास धोका

 जोतिबा डोंगर परिसरात भाविकांना विक्रीस होणारा पेढा व दुग्धजन्य पदार्थ भेसळयुक्त आणि आरोग्यास घातक असल्याचा गंभीर आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल आनंदा नयाळे यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे केला आहे. यात्रेदरम्यान दररोज 2 ते 3 टन पेढा विक्री होतो, मात्र त्यावर कोणतेही योग्य तपासणी किंवा नियंत्रण नसल्याचा आरोप त्यांनी केला. पेढ्याची निर्मिती, घटक व टिकण्याचा कालावधी बॉक्सवर लिहिला जात नाही, तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून फक्त कागदोपत्री तपासणी होत असल्याचे त्यांनी म्हटले.

नवाळे यांनी सांगितले की, यापूर्वी 2000 किलो भेसळयुक्त पेढा नष्ट करण्यात आला होता, तरीही विक्रेत्यांवर कोणतीही फौजदारी कारवाई झाली नाही. या विक्रीत बाहेरील विक्रेत्यांचा मोठा सहभाग असून, त्यांचा पत्ता व तपशील कधीही पडताळला गेला नाही. अशा दूषित पदार्थांमुळे दोन ते अडीच कोटी भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

त्यांनी पंधरा दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास जोतिबा डोंगरावर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे आणि संभाव्य आरोग्य अपघाताची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर टाकली आहे.


जोतिबा डोंगरावर भेसळयुक्त पेढा विक्रीचा गंभीर आरोप
Total Views: 138