विशेष बातम्या

कागल नगर परिषद मतदार यादीत गंभीर घोळ!

Serious confusion in the Kagal Municipal Council voter list


By nisha patil - 10/18/2025 3:22:43 PM
Share This News:



कागल नगर परिषद मतदार यादीत गंभीर घोळ!

समरजित घाटगे यांची अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

कागल नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. ३४२ मतदारांची नावे गायब, ८२२ नावे दुबार, तसेच ४५८ मयत मतदारांची नावे अद्याप वगळलेली नाहीत. काही प्रभागांत घरातच अनेक मतदारांची नोंद झाल्याचेही समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आणि शाहू ग्रुप अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व निवडणुकीपूर्वी सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.


कागल नगर परिषद मतदार यादीत गंभीर घोळ!
Total Views: 54