विशेष बातम्या
युवासेना युवती जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांच्या पुढाकाराने गटार स्वच्छतेचे काम मार्गी
By nisha patil - 5/8/2025 4:19:13 PM
Share This News:
युवासेना युवती जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांच्या पुढाकाराने गटार स्वच्छतेचे काम मार्गी
वॉर्ड क्र. 11 मध्ये नागरिकांची समस्या सोडवली; शिवसेना (शिंदे गट)च्या सलोनी शिंत्रे यांची तत्परता
इचलकरंजी शहरातील वॉर्ड क्रमांक ११ मधील मुक्त सैनिक सोसायटीत ब्लॉक झालेल्या गटार व वेटरमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. या समस्येवर लक्ष केंद्रीत करत शिवसेना (शिंदे गट) युवासेना युवती जिल्हाप्रमुख सलोनी सुषमा संजय शिंत्रे यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून गटार स्वच्छतेचे काम मार्गी लावले.
त्यांच्या तात्काळ पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वेळेत काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सलोनी शिंत्रे यांनी स्थानिक पातळीवरील समस्या तत्काळ सोडवण्याची भूमिका बजावत आपल्या जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
युवासेना युवती जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे यांच्या पुढाकाराने गटार स्वच्छतेचे काम मार्गी
|