मनोरंजन

आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान पूर्णपणे खचला होता; अभिनेत्री गिरिजा ओकचा खुलासा

Shah Rukh Khan was completely devastated when Aryan Khan was in jail


By nisha patil - 12/31/2025 12:37:14 PM
Share This News:



बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांच्याशी संबंधित ड्रग्स प्रकरण त्या काळात प्रचंड चर्चेत होतं. या कठीण काळात शाहरुख खानची मानसिक अवस्था कशी होती, याबाबत अभिनेत्री गिरिजा ओक हिने नुकत्याच एका मुलाखतीत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गिरिजा ओकने शाहरुख खानसोबत ‘जवान’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आर्यन खान ड्रग्स प्रकरण घडलं होतं. गिरिजा ओकने सांगितले की, त्या काळात शाहरुख खान अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता.

गिरिजा म्हणाली, “आर्यन खान प्रकरण सुरू असताना आम्ही ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. अनेक कलाकार आपल्या मुलांना भेटू शकत नसल्याबद्दल बोलत होते. तेव्हा शाहरुख खान स्वतः पुढे आला आणि म्हणाला की, मलाही माझ्या मुलांना फारसं भेटता येत नाही. अबराम शाळेत असतो, सुहाना तिच्या कामात व्यस्त असते आणि आर्यनही आपल्या कामात गुंतलेला असतो. त्यामुळे मी सुहानाला कधी कधी सेटवर भेटायला बोलावतो.”

आर्यन खान प्रकरण सुरू असताना शाहरुख खानने सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं पूर्णपणे टाळलं होतं, असंही गिरिजाने सांगितलं. जवळपास तीन ते चार महिने तो कोणत्याही कार्यक्रमात दिसला नाही. एवढंच नाही, तर ‘जवान’ चित्रपटाचं चित्रीकरणही त्याने काही काळासाठी थांबवलं होतं. त्या काळात शाहरुखशी संपर्क साधणंही अवघड झालं होतं, असं गिरिजा म्हणाली.

दरम्यान, 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकत आर्यन खानला अटक केली होती. जवळपास 25 दिवस तो तुरुंगात होता. या संपूर्ण कालावधीत शाहरुख खान प्रचंड मानसिक तणावाखाली होता, हे गिरिजा ओकच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे.


आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान पूर्णपणे खचला होता; अभिनेत्री गिरिजा ओकचा खुलासा
Total Views: 25