शैक्षणिक

शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 82.54 टक्के

Shahaji Chhatrapati College 12th result


By nisha patil - 5/5/2025 8:49:35 PM
Share This News:



शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 82.54 टक्के
 

कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 82.54 टक्के लागला. यामध्ये वाणिज्य शाखा 86.69 ℅ तर कला शाखेचा 77.29 % निकाल लागला. वाणिज्य शाखेत धनश्री मारुती मोरे 88.17 ℅ गुण मिळवून प्रथम आली तर कला शाखेत ज्योती दादासो चव्हाण 79.00 % गुण मिळवून प्रथम आली. 
   

महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे कला शाखा - रागिनी अशोक आवळे 76.00℅ द्वितीय, शारदा अरविंद चौगले 74.50 ℅ तृतीय क्रमांक, श्रावणी सुरेश सावंत  72. 00℅ चतुर्थ क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत - आदित्य अनिल बनसोडे 83. 87 ℅ द्वितीय, ऋतिका शहाजी हुंबे  76.67 ℅ तृतीय क्रमांक, रोहन संजय खेताल 74.50 ℅ चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे (दादा), मानद सचिव श्रीमती संगीता विजयसिंह बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, पर्यवेक्षक प्रा. पी. के. पाटील व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल 82.54 टक्के
Total Views: 106