बातम्या
शहाजी महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार
By nisha patil - 3/12/2025 4:11:30 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर:श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील एन. एस. एस. विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्तपणे जागतिक दिव्यांग दिना च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमला दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. या वेळी दिव्यांग विध्यार्थी व त्यांचे पालक यांनी मनोगत व्यक्त केली.
त्यांचा प्रोत्साहन पर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मार्गदर्शन मिळाले.
यावेळी डॉ. राहुल मांडणीकर, श्री रविंद्र भोसले, श्री मनीष भोसले डॉ. पांडुरंग पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. विजय देठे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. संतोष कांबळे व प्रा. प्रशांत मोटे यांनी केले.
शहाजी महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार
|