शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयास स्कॉफचे 'ए' प्लस मानांकन
By nisha patil - 2/21/2026 4:27:40 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयास स्कॉफचे 'ए' प्लस मानांकन
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कनिष्ठ विभागास शासनाच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (स्कॉफ) मूल्यांकनास ए प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. शैक्षणिक वर्ष 2025- 2026 मध्ये झालेल्या स्कॉफ तपासणीमध्ये महाविद्यालयास 98. 23 % गुण प्राप्त झाले होते. याबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मूल्यांकनासाठी संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग दादा बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयसिंह बोंद्रे वहिनी ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यावेळी स्कॉफ समिती प्रमुख प्रा. ए. बी.शेळके, प्रभारी पर्यवेक्षक प्रा.पी.के. पाटील, प्रबंधक श्री.रवींद्र भोसले, अधीक्षक श्री. मनीष भोसले यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
शहाजी महाविद्यालयास स्कॉफचे 'ए' प्लस मानांकन
|