बातम्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमांद्वारे अभिवादन
By nisha patil - 3/10/2026 12:00:43 AM
Share This News:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमांद्वारे अभिवादन
कोल्हापूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात विविध उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. गांधीजींचे सत्य, अहिंसा,प्रामाणिकता हे विचार आजही गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी विशेष व्याख्याना प्रसंगी केले.
महाविद्यालय आणि संस्था परिसरात स्वच्छता मोहीम, ग्रंथ प्रदर्शन , प्रमाणपत्र वितरण, अविष्कार संशोधन स्पर्धा व इतर उपक्रमाद्वारे गांधीजींना अभिवादन करण्यात आले.
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात महात्मा गांधीजींना समजून घेताना या विषयावर प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे विशेष व्याख्यान झाले. समाजशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकावर आयोजित घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्तविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.एम.देसाई यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.शोभा चाळके- म्हमाने यांनी केले. आभार डॉ. पल्लवी कोडग यांनी मांनले.
शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्यावरील45 पुस्तकांचे प्रदर्शन यावेळी संपन्न झाले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्था आणि महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रा. विजय देठे यांनी या स्वच्छता मोहीमेचे संयोजन केले.
महाविद्यालयातील सायन्स विभागाच्या वतीने अविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न झाली. विविध विभागातील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.प्रा.मनोज कांबळे यांनी संयोजन केले. परीक्षक डॉ.गावडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. महाविद्यालयाचे प्रबंध रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यांनी विविध उपक्रमात सहभाग नोंदवला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमांद्वारे अभिवादन
|