बातम्या
शहाजी महाविद्यालयात श्री शहाजी छत्रपती महाराज यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
By Administrator - 4/4/2026 5:46:55 PM
Share This News:
श्रीमंत विक्रमसिंह उर्फ शहाजी महाराजांचे दुसर्या महायुद्धातील कार्य आणि शौर्य प्रेरणादायी : प्रा. डॉ. सुरेश शिखरे
शहाजी महाविद्यालयात श्री शहाजी छत्रपती महाराज यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
कोल्हापूर: दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीत आपल्या प्राणांची पर्वा न करता मराठा लाईट इन्फन्ट्रीचे नाव जगभरात उज्वल करणाऱ्या श्रीमंत विक्रमसिंह उर्फ शहाजी महाराजांची लष्करी कामगिरी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुरेश शिखरे यांनी केले.
श्रीमंत श्री शहाजी छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते, तर संयोजन डॉ. शिवाजी रायजादे यांनी केले होते.
प्रा. शिखरे पुढे म्हणाले की, दुसरे महायुद्ध सुरू होताच महाराजांनी केवळ सुरक्षित न राहता प्रत्यक्ष युद्धात उतरण्याची इच्छा व्यक्त केली. इंदूर आणि महू येथील खडतर लष्करी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांची नियुक्ती बेळगावच्या २/५ मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये झाली. के.सी.एस.आय. सारखी मानाची पदवी मिळाल्यानंतरही त्यांनी रणांगणावरील आव्हाने स्वीकारली.
डॉ. शिखरे यांनी शहाजी महाराजांच्या शौर्याचे विविध टप्पे उलगडण्यात आले. १९४१ च्या ऑपरेशन क्रुसेडर दरम्यान हाल्पाया पास खिंडीचे रक्षण असो किंवा आफ्रिकेतील एलगुबीची लढाई, महाराजांनी अचाट धैर्य दाखवले. कॅप्टन पाळंदे शहीद झाल्यानंतर ‘डी’ कंपनीचे कमांडर म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली. एका प्रसंगी तर इटालियन विमानाने टाकलेला बॉम्ब त्यांच्यापासून केवळ १५ पावलांवर पडला होता, परंतु दैवबलाने तो फुटला नाही.
जानेवारी १९४२ मध्ये शत्रूने बेंगाझीकडे मोर्चा वळवला असताना संदेशवहनाची कठीण कामगिरी महाराजांनी फत्ते केली. तसेच ‘स्लोटा’ येथील लढाईत जर्मन सैन्याचा प्रतिकार करून त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले.
युद्धातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘मेजर’ पदाने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘द आफ्रिका स्टार’, ‘द इटली स्टार’, ‘द डिफेन्स मेडल’ आणि ‘द वॉर मेडल’ यांसारखी अनेक पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शानेदिवाण यांनी, भारतीय सैनिकांनी आणि विशेषतः मराठा तुकड्यांनी जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशाचा इतिहास जपण्याची गरज व्यक्त केली.या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंगराव बोंद्रे दादा यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय क
शहाजी महाविद्यालयात श्री शहाजी छत्रपती महाराज यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
|