खेळ
शिवाजी विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेत शहाजी महाविद्यालय विजेता
By nisha patil - 9/1/2026 11:38:52 AM
Share This News:
कोल्हापूर : येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय हँडबॉल पुरुष स्पर्धेत दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने अंतिम सामन्यात अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाला नमवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच वाघोली सातारा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक ही पटकावला.
विजेत्या संघात उच्चतम कामगिरी करणाऱ्या हर्षल वाळके, सुमित बच्चे व पारस खिचडे यांची जयपुर, राजस्थान येथे होणाऱ्या वेस्ट झोन अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच कर्णधार ओम दुर्गुळे याची दिल्ली येथे होणाऱ्या ४७ व्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली.
विजेत्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हॉइस चीफ पेट्रन व चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे दादा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण , जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
शिवाजी विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेत शहाजी महाविद्यालय विजेता
|