शैक्षणिक
*शहाजी कॉलेज च्या श्रावणी कुंभार व प्राची देबाजे यांना वेटलिफ्टिंग खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग 2025 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक
By nisha patil - 11/8/2025 5:50:44 PM
Share This News:
*शहाजी कॉलेज च्या श्रावणी कुंभार व प्राची देबाजे यांना वेटलिफ्टिंग खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग 2025 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक
दिनांक:- 9 ऑगस्ट 2025 रोजी हर्क्युलस वेटलिफ्टिंग जिम कुरुंदवाड येथे झालेल्या खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग 2025 वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मधील इयत्ता ११ वी वाणिज्य मध्ये शिकत असलेली कु. श्रावणी तानाजी कुंभार हिने 44 किलो वजन गटामध्ये एकूण 110 किलो वजन उचलून सुवर्ण पदक मिळवले व 12 वी कला मध्ये शिकणारी कु.प्राची भरत देबाजे हिने 86 किलो वरील वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले तसेच कु.रिया रामचंद्र सावंत हिने सहभाग नोंदवला.
सर्व विजेत्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे(दादा),प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण सर, रजिस्टर रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, प्र पर्यवेक्षक पी के पाटील सर, जिमखाना प्रमुख डॉ.प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रा.प्रशांत मोटे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
*शहाजी कॉलेज च्या श्रावणी कुंभार व प्राची देबाजे यांना वेटलिफ्टिंग खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग 2025 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक
|