बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत शहाजी माडभगत यांचे यश

Shahaji Madbhagats success in Maharashtra Civil Services Examination


By nisha patil - 2/3/2026 12:47:09 PM
Share This News:



महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत शहाजी माडभगत यांचे यश


   आजरा(हसन तकीलदार) :- गवसे ता. आजरा येथील सद्या राहणार कोल्हापूर येथील शहाजी संभाजी माडभगत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उज्वल यश संपादन करून कनिष्ठ भुवैज्ञानिक (राजपत्रित अधिकारी गट ब) भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग मध्ये निवड झाली आहे.
     शहाजी माडभगत यांचे वडील संभाजी माडभगत हे सेवानीवृत्त पोस्टमास्तर आहेत. राजारामपुरी कोल्हापूर येथे ते सेवेत होते. तर शहाजी माडभगत यांचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण तवनाप्पा पाटणे हायस्कुल राजारामपुरी कोल्हापूर, पदवी पर्यंतचे शिक्षण राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथून बी. एस. सी. जिओलोजी मधून पदवी घेतली.त्यानंतर उच्चशिक्षण एम. एस. सी. जिओलोजी नागपूर विद्यापीठातून पूर्ण केले. आणि महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेची तयारी करून घवघवीत यश संपादन केले. त्यांची भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा विभागमध्ये कनिष्ठ भुवैज्ञानिक (राजपत्रित अधिकारी गट ब )या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे बंधू अरुण माडभगत (ऍग्रीओव्हरशिअर, आजरा साखर )यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंद व्यक्त केला जात आहे.


महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत शहाजी माडभगत यांचे यश
Total Views: 432