बातम्या

शहाजी महाविद्यालयात गुरुवारी शहाजी ऊर्जा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

Shahaji Urja Annual Prize Distribution Ceremony


By Administrator - 9/3/2026 3:07:09 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात गुरुवारी शहाजी ऊर्जा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
 

 शंभरहून अधिक बक्षिसांचे विद्यार्थ्यांना होणार वितरण . 

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात गुरुवारी (दि.12 मार्च रोजी) सकाळी साडेआठ वाजता शहाजी ऊर्जा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. 
     

महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी  संचालक, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग विजयराव बोंद्रे दादा यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
   

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य व हितचिंतक यांनी ठेवलेल्या साडेनऊ लाख रुपये ठेव रकमेतील व्याजातून येणाऱ्या रकमेची पारितोषिके  महाविद्यालयातील गुणवान विद्यार्थ्यांना दिली जातात शंभरहून अधिक ही बक्षिसे आहेत. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


शहाजी महाविद्यालयात गुरुवारी शहाजी ऊर्जा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
Total Views: 14