बातम्या

शहाजी महाविद्यालयात पालक सभा संपन्न

Shahaji college 5


By nisha patil - 6/30/2026 3:35:19 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात पालक सभा संपन्न

पालकांनी सामाजिक कर्तव्या बरोबर मुलांच्या भविष्याकडेही लक्ष देण्याची गरज : प्राचार्य डॉ. आर. के. शानदिवाण

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार असणारी व्यकी म्हणजे पालक. मग पालकांनीही जबाबदारी, जाणीव होण्यासाठी पालक सभांचे नियोजन केले. पालकांच्या मोबाईलचे नियंत्रण महत्वाचे आहे. पालकांनी मुलांच्या गुणवत्ते संदर्भात सजग असावे, उपस्थितीची चौकशी करताना संवादही करावी.

अभ्यासाच्या नियोजनावर पालकांनीही लक्ष द्यावे,अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आयोजित 12 वी विद्यार्थ्यांच्या पालक सभेत अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केले.

    प्राचार्य डॉ. शानदिवाण म्हणाले, पालकांनी सामाजिक कर्तव्या बरोबर मुलांच्या भविष्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अभ्यासाबरोबर मुलाच्या कलागुणांचा विचार करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी.

        कार्यक्रमात 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी ज्योती कोरवी, अजय मरेकर, पुनम राऊत व पालक

सोनम मिठारी, भिमराव पाटील, सागर साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक प्रा. पी. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

     स्वागत व प्रास्तविक प्रा. सौ. एस. डी. चौगले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. पी. के. मोटे यांनी केले.प्रा. व्ही.ए. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रबंधक रविंद्र भोसले, अधिक्षक मनिष भोसले, पालक सभा समिती प्रमुख प्रा. सौ. एम. एम. गायकवाड आदीसह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

   कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग (दादा) बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगिता बोंद्रे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले..


शहाजी महाविद्यालयात पालक सभा संपन्न
Total Views: 18