बातम्या

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Shahaji college in babasaheb ambedkar jayanti


By nisha patil - 4/14/2026 10:42:34 PM
Share This News:



श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन  मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यक्रमास मार्गदर्शन मिळाले. 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. समाजकल्याण विभाग कोल्हापूरच्या सौ. आशा रावण यांनी उद्देशपत्रिकेचे वाचन केले. 

 डॉ. डी. पी. गावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या आर्थिक विचारावर आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाला आय.क्यु. सी. समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, जुनिअर विभागाचे पर्यवेक्षक पी.के. पाटील, परिक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. ए.आर. कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. शुभम पाटील यांनी केले. 

 प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले , सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Total Views: 8