बातम्या
शहाजी कॉलेजच्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंची पोलीस दलात निवड
By nisha patil - 3/4/2026 12:11:44 AM
Share This News:
शहाजी कॉलेजच्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंची पोलीस दलात निवड
कोल्हापूर दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कु माधुरी चेचर (कोल्हापूर पोलिस दल) व कु. मयुरी बोडके (सांगली पोलीस दल) या ठिकाणी दोघींची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी मा. प्राचार्य यांनी स्व लिखित भारतीय संविधानाचे पुस्तक देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले व पालक उपस्थित होते.
शहाजी कॉलेजच्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंची पोलीस दलात निवड
|