शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयात जनजाती गौरव दिन साजरा

Shahaji college kolhapur 1


By nisha patil - 11/16/2025 11:55:25 PM
Share This News:



बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान : डॉ.डी के वळवी 

शहाजी महाविद्यालयात जनजाती गौरव दिन साजरा

 

 कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भगवान बिरसा मुंडा यांचे मोठे योगदान आहे.हजारो आदिवासींना एकत्र करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठे आंदोलन उभे करून लढा दिला .तसेच आदिवासींना जल जमीन आणि जंगल यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ते अखंड पर्यंत प्रयत्न करीत राहिले असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख डॉ.डी के वळवी यांनी केले .

 भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात जनजाती गौरव दिनानिमित्त त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सांस्कृतिक विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यक्रमास प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले .

भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन व कार्य यांची माहिती देऊन डॉ.डी.के.वळवी म्हणाले बिरसा मुंडा यांना केवळ 25 वर्षाचे आयुष्य लाभले.बिरसा मुंडा यांनी 5000 हून अधिक आदिवासींना एकत्र करून इंग्रजांच्या विरुद्ध लढा उभा केला होता.

त्यांच्याविरुद्ध आंदोलन उभे केले होते .हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी बिरसा मुंडा यांना इंग्रजांनी तुरुंगात डांबले . त्यांना दूषित पाणी देण्यात आले .यातच ते तुरुंगात हुतात्मा झाले. बिरसा मुंडा यांनी मध्यप्रदेश ,महाराष्ट्राच्या सीमा वरती आदिवासी भागांमध्ये मोठे आंदोलन उभा केले. त्यासाठी हजारो आदिवासींना त्यांनी संघटित केले.

त्यांच्यामध्ये प्रेरणा चेतना निर्माण केली. इंग्रजांनी जल जंगल आणि खनिज संपत्ती यांचे शोषण सुरू ठेवले होते. त्यांच्याविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला .1875 ते 1900 सालापर्यंत त्यांना जीवन लाभले. अवघ्या 25 वर्षात त्यांनी आदिवासींसाठी मोठे कार्य उभा केले .देशभरातील आदिवासी त्यांना भगवान मानतात .त्यांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि आदिवासींना एकत्र करण्यामध्ये मोठे योगदान आहे. 

 प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, देशात आठ ते नऊ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. त्यांनी आपली संस्कृती परंपरा टिकून ठेवलीआहे .देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांचे मोठे योगदान आहे.

आदिवासी जमातीतील विविध जाती जमातींना एकत्र करून त्यांनी देश हितासाठी मोठे योगदान दिले. आदिवासी समाजात त्यांनी चेतना निर्माण केली .त्यांना विधायक दिशा दिली. त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त देशभर विविध उपक्रम होत आहेत. स्वतंत्र लढ्यामध्ये दुर्लक्षित राहिलेल्या अशा स्वातंत्र्यवीरांचे सर्वांनी स्मरण करणे गरजेचे आहे .

 स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शिवाजीराव रायजादे यांनी केले. डॉ.रचना माने यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. 

 आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर ,सह समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे,परीक्षा विभाग प्रमुख डॉ.के.एम.देसाई, सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.


शहाजी महाविद्यालयात जनजाती गौरव दिन साजरा
Total Views: 21