बातम्या
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शहाजी महाविद्यालयात वाचन सप्ताह
By nisha patil - 6/25/2026 3:20:03 PM
Share This News:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शहाजी महाविद्यालयात वाचन सप्ताह
कोल्हापूर :श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती निमित्त वाचन सप्ताहास सुरुवात झाली. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावरील 71 पुस्तके या ग्रंथप्रदर्शनामध्ये ठेवलु असून विद्यार्थी, प्राध्यापक ,प्रशासकीय सहकारी, इतर वाचक शिवाजी ग्रंथालयात बसून या ग्रंथांचे वाचन करतात व अभिप्राय नोंदवतात.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून वाचन सप्ताहास सुरुवात करण्यात आली.
शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, आय. क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर, सह समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे,परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई ,स्टाफ सेक्रेटरी डॉ.डी.के.वळवी, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले , सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .
ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले. गणेश पाटील,सौ. एम. एम.भोसले, सौ. अर्पणा गावडे , सुहास टिपुगडे, विजय लाड, दीपक गुरव, विलास पाटील यांनी संयोजन केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शहाजी महाविद्यालयात वाचन सप्ताह
|