बातम्या
शहाजी महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
By nisha patil - 11/4/2026 3:25:09 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
महात्मा फुले यांच्या विचारांची आजही समाजाला गरज: डॉ.के.एम.देसाई
कोल्हापूर : महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता, बंधुता, अंधश्रद्धा निर्मूलन, विवेक वाद व वैज्ञानिक दृष्टिकोन या विचारांची आजही गरज आहे.त्यांनी शेतकरी,कामगारांविषयी केलेल्या कार्याचे आजही स्मरण होते. त्यांचे हे कार्य आजही गरजेचे आहे असे प्रतिपादन शहाजी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एम.देसाई यांनी केले.
महात्मा फुले यांच्या दोनशेव्या जयंती दिनानिमित्त आज महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. के. एम. देसाई म्हणाले की, समाजात अंधश्रद्धा, भोंदूगिरी वाढलेली आहे. त्यामुळे खरात सारखे प्रकरण घडते आहे. महात्मा फुले यांनी पावणे दोनशे वर्षांपूर्वी सांगितलेले विचार आजही गरजेचे आहेत. अंधश्रद्धा, जातीभेद ,स्त्रियांचे शोषण ,अज्ञान , अंधकार याविरुद्ध त्यांनी त्यावेळी प्रखर विरोध केला होता. आजही अशा विचारांची गरज आहे.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले,महात्मा फुले यांचे विचार श्रीपतराव बोंद्रे दादा यांनी कृतीतून अचरनात आणले होते. त्यांनी मुलींना फी माफी, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.स्त्री शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिले होते. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. सरोज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. सारिका कांबळे यांनी मानले .
या कार्यक्रमास प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ.आर.डी.मांडणीकर, डॉ.डी.के.वळवी,सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहाजी महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
|